bjp | Sarkarnama

सहकार बोर्डात भाजपचा प्रवेश 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 मे 2017

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळविलेल्या यशानंतर आता महत्त्वाच्या सहकारी संस्था, बार असोसिएशनच्या निवडणुका टार्गेट केल्या आहेत. सहकार बोर्डावर भाजपचे दोन संचालक बिनविरोध गेले आहेत. 

सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळविलेल्या यशानंतर आता महत्त्वाच्या सहकारी संस्था, बार असोसिएशनच्या निवडणुका टार्गेट केल्या आहेत. सहकार बोर्डावर भाजपचे दोन संचालक बिनविरोध गेले आहेत. 

पालिका, जिल्हा परिषदेतील यशानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आता सर्वच निवडणुकीत लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. सध्या जिल्हा सहकार बोर्ड व जिल्हा बार असोसिएशनची निवडणूक सुरू आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार उभे केले आहेत. जिल्हा सहकार बोर्डासाठी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या सूचनेनुसार प्रभाकर साबळे यांना उमेदवारी दिली आहे. पण सहकार बोर्ड ही संस्था फारशी आर्थिक सक्षम नसल्याने येथे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपच्या नेत्यांसोबत बसून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठीचे प्रयत्न केले. त्यातून भाजपचे दोन सदस्य या बोर्डावर बिनविरोध झाले आहेत. तर बार असोसिएशनची निवडणूक पक्षीय पातळीवर होत नसली तरी भाजपशी संबंधित वकिलांनी यामध्ये अधिक लक्ष घालून आपले पदाधिकारी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख