bjp | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

भाजप अधिवेशनामुळे मंत्रालय सुमसाम

संदीप खांडगेपाटील: सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 एप्रिल 2017

मुंबई : पिंपरी-चिंचवड येथे सुरू असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणीच्या अधिवेशनाचा फटका मंत्रालयीन कामकाजालाही बसला असून बुधवारी दिवसभर मंत्रालयात भाजपा मंत्र्यांच्या कार्यालयात सुमसाम वातावरण असल्याचे दिसून आले. 

मंगळवारी कॅबिनेटची मीटिंग असल्यामुळे भाजपा मंत्र्यांच्या कार्यालयात गावच्या जत्रेसारखी गर्दी होती आणि 24 तासानंतर बुधवारी त्याच कार्यालयासमोर कामे घेवून घेणाऱ्या नागरिकांची गर्दी तर सोडा, पण त्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीही पहावयास मिळाले नाही. 
पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथे भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे 26 व 27 एप्रिल असे दोन दिवसीय अधिवेशन असल्याने राज्यातील भाजपा मंत्री या अधिवेशनाकरिता गेले होते. 

काही भाजपा मंत्र्यांनी त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनाही सोबत नेल्याचे दिसून आले. त्यामुळे या भाजपा मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये दिवसभरामध्ये तुरळक प्रमाणावर वर्दळ पहावयास मिळाली. पिंपरी चिंचवडच्या पक्षीय कामकाजाचा भाजपा मंत्र्यांच्या कार्यालयीन कामकाजाला फटका बसल्याचे स्पष्टपणे पहावयास मिळाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख