आजचा वाढदिवस : योगेश टिळेकर, आमदार, भाजप (हडपसर, पुणे) - birthday of yogesh tilekar mla | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आजचा वाढदिवस : योगेश टिळेकर, आमदार, भाजप (हडपसर, पुणे)

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

आमदार योगेश टिळेकर यांचे कुटुंब हे सांप्रदायिक वारसा असणारे कुटुंब आहे. त्यांची आई रंजना टिळेकर पुणे महानगरपालिकेत नगरसेविका आहेत. यापूर्वीही त्या पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका होत्या. 2014 विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना व भाजप युती न झाल्याने योगेश टिळेकर यांना ऐनवेळी भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली. प्रचाराला कमी अवधी मिळाला असतानाही ते निवडून आले. त्यांनी लुल्लानगर, मांजरी, सय्यदनगर, घोरपडी उड्डाणपूल, कात्रज कोंढवा रस्ता, मांजरी पाणीपुरवठा योजना, वनविभागात उद्याने, कात्रज ते लोणीकंद हा नॅशनल हायवे, हडपसरमध्ये मेट्रो इत्यादी कामांना चालना दिली आहे.

आमदार योगेश टिळेकर यांचे कुटुंब हे सांप्रदायिक वारसा असणारे कुटुंब आहे. त्यांची आई रंजना टिळेकर पुणे महानगरपालिकेत नगरसेविका आहेत. यापूर्वीही त्या पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका होत्या. 2014 विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना व भाजप युती न झाल्याने योगेश टिळेकर यांना ऐनवेळी भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली. प्रचाराला कमी अवधी मिळाला असतानाही ते निवडून आले. त्यांनी लुल्लानगर, मांजरी, सय्यदनगर, घोरपडी उड्डाणपूल, कात्रज कोंढवा रस्ता, मांजरी पाणीपुरवठा योजना, वनविभागात उद्याने, कात्रज ते लोणीकंद हा नॅशनल हायवे, हडपसरमध्ये मेट्रो इत्यादी कामांना चालना दिली आहे. नम्र स्वभावामुळे ते त्यांच्या मतदारसंघात लोकप्रिय आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख