आजचा वाढदिवस : वल्लभ बेनके , माजी आमदार, जुन्नर, पुणे - birthday of vallabh benke | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : वल्लभ बेनके , माजी आमदार, जुन्नर, पुणे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 जून 2018

वल्लभ बेनके यांचा जन्म 23 जून 1950 रोजी हिवरे बुद्रूक (ता.जुन्नर) या छोट्याशा गावात झाला. शेती हाच प्रमुख व्यवसाय. त्यांचा धरणग्रस्त शेतकरी, रोटरी क्‍लबचे अध्यक्ष ते चार वेळा आमदार असा प्रवास थक्क करणारा आहे. जुन्नर विधान सभेची सलग सहा वेळा (1985 ते 2009 दरम्यान) उमेदवारी, चार वेळा आमदार असा विक्रम श्री. बेनके यांनी तालुक्‍यात प्रस्थापित केला आहे. कुशल संघटक, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाची जाण असणारा व प्रशासनावर पकड असणारा अभ्यासू नेता, सर्व सामान्य कार्यकर्त्यावर जिवापाड प्रेम करणारा, मुत्सद्दी नेता अशी त्यांची ओळख आहे. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा विश्‍वासातील ते आहेत.

वल्लभ बेनके यांचा जन्म 23 जून 1950 रोजी हिवरे बुद्रूक (ता.जुन्नर) या छोट्याशा गावात झाला. शेती हाच प्रमुख व्यवसाय. त्यांचा धरणग्रस्त शेतकरी, रोटरी क्‍लबचे अध्यक्ष ते चार वेळा आमदार असा प्रवास थक्क करणारा आहे. जुन्नर विधान सभेची सलग सहा वेळा (1985 ते 2009 दरम्यान) उमेदवारी, चार वेळा आमदार असा विक्रम श्री. बेनके यांनी तालुक्‍यात प्रस्थापित केला आहे. कुशल संघटक, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाची जाण असणारा व प्रशासनावर पकड असणारा अभ्यासू नेता, सर्व सामान्य कार्यकर्त्यावर जिवापाड प्रेम करणारा, मुत्सद्दी नेता अशी त्यांची ओळख आहे. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा विश्‍वासातील ते आहेत. धरणग्रस्तांच्या प्रश्‍नासाठी ते विविध आंदोलनात सहभागी झाले. येथूनच त्यांच्या सामाजिक कार्यास सुरवात झाली. धरणग्रस्तांच्या प्रश्‍नासाठी दोन वर्ष संघर्ष केला. शासनाने धरणग्रस्त कुटुंबातील सुशिक्षित तरुणांना धरणाच्या कामाचा ठेका देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनी कांदळी येथे औद्योगीक वसाहतीची स्थापना केली. कुकडी प्रकल्पा अंतर्गत असलेले कालवे व धरण दुरुस्ती कामासाठी 97 कोटी रुपयांचा निधी जागतिक बॅंकेकडून मंजूर झाला. लेण्याद्री व ओझर देवस्थानच्या परिसर विकासासाठी निधी मिळवून दिला. नारायणगाव येथे टोमॅटोचे खरेदी विक्री बाजार केंद्र सुरू केले. प्रशासनावर पकड असणारा नेता म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. आजारपणामुळे मागील चार वर्षा पासून सक्रिय राजकारणा पासून ते अलिप्त आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख