birthday of thorat | Sarkarnama

आजचा वाढदिवस - आमदार, बाळासाहेब थोरात, कॉंग्रेस

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब थोरात हे कॉंग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील कार्यकारिणीचे सदस्य आहेत. पक्षाच्या देशभरातील महत्त्वाच्या निर्णयात त्यांचा सहभाग असतो. संगमनेर व परिसराचा विकास करताना थोरात यांनी वडिलांचा वारसा चालवत संगमनेर सहकारी साखर कारखाना यशाच्या शिखरावर नेवून ठेवला. अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर कुक्कुटपालन संघ, आदी संस्थांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना त्यांनी रोजगार व मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करून दिली. थोरात यांनी कृषीमंत्री, पशुसंवर्धनमंत्री, महसूलमंत्री अशी पदे भूषविली. एक प्रभावी मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द गाजली.

संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब थोरात हे कॉंग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील कार्यकारिणीचे सदस्य आहेत. पक्षाच्या देशभरातील महत्त्वाच्या निर्णयात त्यांचा सहभाग असतो. संगमनेर व परिसराचा विकास करताना थोरात यांनी वडिलांचा वारसा चालवत संगमनेर सहकारी साखर कारखाना यशाच्या शिखरावर नेवून ठेवला. अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर कुक्कुटपालन संघ, आदी संस्थांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना त्यांनी रोजगार व मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करून दिली. थोरात यांनी कृषीमंत्री, पशुसंवर्धनमंत्री, महसूलमंत्री अशी पदे भूषविली. एक प्रभावी मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. 2014 च्या निवडणुकीत कॉंग्रेसविरोधी लाट असतानाही संगमनेरमध्ये 75 हजार मतांची आघाडी घेत त्यांनी विजय मिळविला होता. देशात, राज्यात सत्ता नसली, तरी मतदारसंघातील कामे थोरात यांनी मोठ्या खुबीने करून घेतली. या सर्व कामाची दखल घेत कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कोअर कमिटीत त्यांचा समावेश झाला. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख