आजचा वाढदिवस : सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री भाजप - birthday of sudhir mungantiwar | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री भाजप

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 जुलै 2018

चंद्रपूर जिल्ह्यातल्या विद्यार्थी चळवळीतून सुधीर मुनगंटीवार यांचे नेतृत्व समोर आले. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार मिळालेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी प्रारंभीच्या राजकीय वाटचालीत अपयशही पाहिले. लोकसभा निवडणुकीत अपयशी ठरल्यानंतर 1995 मध्ये ते चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. तेव्हापासून त्यांचा राजकीय आलेख चढता राहिला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा आता पूर्ण प्रभाव आहे. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून तीनवेळा निवडून आल्यानंतर आता मूल मतदारसंघातून ते सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातल्या विद्यार्थी चळवळीतून सुधीर मुनगंटीवार यांचे नेतृत्व समोर आले. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार मिळालेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी प्रारंभीच्या राजकीय वाटचालीत अपयशही पाहिले. लोकसभा निवडणुकीत अपयशी ठरल्यानंतर 1995 मध्ये ते चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. तेव्हापासून त्यांचा राजकीय आलेख चढता राहिला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा आता पूर्ण प्रभाव आहे. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून तीनवेळा निवडून आल्यानंतर आता मूल मतदारसंघातून ते सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. भाजयुमोचे अध्यक्ष, भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही सुधीर मुनगंटीवार यांनी जबाबदारी पार पाडली आहे. सध्या राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री म्हणून समर्थपणे जबाबदारी सांभाळत असून राज्यातील कर्तबगार व प्रमुख मंत्र्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख