आजचा वाढदिवस : सुभाष देशमुख, सहकारमंत्री भाजप - birthday of subhash deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : सुभाष देशमुख, सहकारमंत्री भाजप

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 12 मार्च 2019

सुभाष देशमुख यांना भाजपने 1998 मध्ये विधान परिषदेची उमेदवारी दिली. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेमधून ही उमेदवारी देण्यात आली. सोलापुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व होते. या दोघांच्या तुलनेत भाजपची ताकद खूपच नगण्य होती. असे असतानाही सहकारमंत्री देशमुख यांनी विजय मिळवून राजकारणात प्रवेश केला. कोणताही राजकीय वारसा नसताना देशमुख यांनी मिळविलेला हा विषय त्यांना खूपच नावलौकिक देऊन गेला. 

2000 मध्ये ते भाजपचे जिल्हाध्यक्ष झाले. त्यानंतर 2004 मध्ये त्यांना पक्षाने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांच्या समोर तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्वला या कॉंग्रेसच्या उमेदवार होत्या. त्यावेळी देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा पराभव केला. त्यानंतर 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी देशमुख यांना माढा मतदारसंघातून थेट शरद पवार यांच्या विरोधातच पक्षाने रिंगणात उतरविले. त्यावेळी केंद्रीयमंत्री असणाऱ्या पवारांच्या विरोधात देशमुखांची डाळ शिजली नाही. त्याचवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. आमदार मधुकर चव्हाण यांनी श्री. देशमुख यांचा पराभव केला. पुन्हा 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सहकारमंत्री देशमुख यांना सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले. त्यावेळी त्यांनी कॉंग्रेसचे तत्कालीन आमदार दिलीप माने यांचा पराभव केला होता. 2014 ला ते भाजपचे प्रदेश उपाध्यक्षही होते. सात जुलै 2016 ला कॅबिनेटमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. लोकसभेसाठी माढ्यातून त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू आहे. सहकारमंत्री म्हणून काम करताना त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये वेगळा ठसाउमटविला आहे. बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख