आजचा वाढदिवस : डॉ. श्रीकांत शिंदे - खासदार, शिवसेना (कल्याण) - birthday of shrikant shinde | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आजचा वाढदिवस : डॉ. श्रीकांत शिंदे - खासदार, शिवसेना (कल्याण)

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 4 फेब्रुवारी 2019

एमबीबीएसनंतर ऑर्थोपेडिकमध्ये एमएस करत असतानाच लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने डॉ. श्रीकांत शिंदे यांचा अचानक राजकारण प्रवेश झाला असला तरी वडील एकनाथ शिंदे यांचे राजकारण व समाजकारण ते लहानपणापासून जवळून बघत होते. आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेले एकनाथ शिंदे कोणाच्याही मदतीला धावून जाणारे नेते म्हणून ठाण्यात प्रसिद्ध आहेत. तोच वारसा डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पहिल्याच प्रयत्नात खासदार झाल्यापासून पुढे चालवला असून कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत अनेक मोठमोठे प्रकल्प सुरू करण्यात त्यांना यश आले आहे. 

झपाट्याने नागरीकरण होत असलेले कल्याण, डोंबिवली, दिवा, अंबरनाथ, उल्हासनगर या त्यांच्या मतदारसंघात मोडणाऱ्या उपनगरांच्या गरजा लक्षात घेऊन रेल्वेचे प्रकल्प, मेट्रो, जलवाहतूक, रस्ते अशा अनेक प्रकल्पांना डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या पाच वर्षांत राज्य आणि केंद्र शासनाकडून मंजुरी मिळवण्यात यश मिळवले. परिणामी, आज त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख