आजचा वाढदिवस : संजय शिंदे, अध्यक्ष, सोलापूर जिल्हा परिषद - birthday of sanjay shinde | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : संजय शिंदे, अध्यक्ष, सोलापूर जिल्हा परिषद

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 31 जुलै 2018

सोलापूर जिल्हा परिषदेचे बिनविरोध अध्यक्ष व जिल्ह्याच्या राजकारणात विकसनशील दृष्टी असलेले नेतृत्व म्हणून संजय शिंदे यांची ओळख आहे. जिल्ह्यातील प्रस्थापित राजकारण्यांची विधान परिषद, जिल्हा परिषद येथील सत्ता उलथवून टाकण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक त्यांची ओळख आहे. 2014 ची विधानसभा निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने त्यांनी लढविली होती. अडीच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. 2019 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करमाळ्यात विकासाची कामे करीत आहेत.

सोलापूर जिल्हा परिषदेचे बिनविरोध अध्यक्ष व जिल्ह्याच्या राजकारणात विकसनशील दृष्टी असलेले नेतृत्व म्हणून संजय शिंदे यांची ओळख आहे. जिल्ह्यातील प्रस्थापित राजकारण्यांची विधान परिषद, जिल्हा परिषद येथील सत्ता उलथवून टाकण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक त्यांची ओळख आहे. 2014 ची विधानसभा निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने त्यांनी लढविली होती. अडीच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. 2019 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करमाळ्यात विकासाची कामे करीत आहेत. साखर कारखाना, सूतगिरणी व कुर्डुवाडी कृषी उत्पन्न बाजार समिती आदर्श पद्धतीने चालवून राजकारणासोबतच उद्योगातही त्यांनी यशस्वी भरारी घेतली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख