आजचा वाढदिवस : राज्यमंत्री संजय राठोड, शिवसेना - birthday of sanjay rathod mla | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आजचा वाढदिवस : राज्यमंत्री संजय राठोड, शिवसेना

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 30 जून 2018

विदर्भातील शिवसेनेचे एकमेव राज्यमंत्री असलेले संजय राठोड यांनी एक सामान्य शिवसैनिक म्हणून राजकारणात प्रवेश केला. यवतमाळ जिल्हा शिवसेना प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा भागातील जनसामान्यांचे प्रश्‍न मांडले. बंजारा समाजाचे प्राबल्य असलेल्या दारव्हा मतदारसंघात 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना पराभूत केले. तेव्हापासून सलग तीनवेळा त्यांनी याच मतदारसंघातून निवडून येण्याचा विक्रम केला. 2014 मध्ये फडणवीस सरकारमध्ये त्यांचा महसूल राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. शिवसेनेचे विदर्भातील ते एकमेव मंत्री आहेत.

विदर्भातील शिवसेनेचे एकमेव राज्यमंत्री असलेले संजय राठोड यांनी एक सामान्य शिवसैनिक म्हणून राजकारणात प्रवेश केला. यवतमाळ जिल्हा शिवसेना प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा भागातील जनसामान्यांचे प्रश्‍न मांडले. बंजारा समाजाचे प्राबल्य असलेल्या दारव्हा मतदारसंघात 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना पराभूत केले. तेव्हापासून सलग तीनवेळा त्यांनी याच मतदारसंघातून निवडून येण्याचा विक्रम केला. 2014 मध्ये फडणवीस सरकारमध्ये त्यांचा महसूल राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. शिवसेनेचे विदर्भातील ते एकमेव मंत्री आहेत. दारव्हा, नेर व दिग्रस या नगरपरिषदांमध्येही शिवसेनेचा भगवा फडकविल्यामुळे राठोड यांचे या भागातील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख