संजय जाधव - खासदार, शिवसेना, परभणी. - birthday of sanjay jadhav mp | Politics Marathi News - Sarkarnama

संजय जाधव - खासदार, शिवसेना, परभणी.

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 1 जून 2018

परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू हरिभाऊ जाधव हे 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये परभणी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडून आले आहेत. त्यांची राजकारणाची सुरवात शिवसैनिक म्हणून झाली. परभणी नगरपरिषदेच्या सदस्यापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यानंतर परभणी विधानसभेचे ते दोन वेळा आमदार त्यानंतर परभणीचे विद्यमान खासदार आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या प्रखर विचारांचा कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची राज्यभरात ख्याती आहे. कडक व शिस्तप्रिय खासदार म्हणून मतदारसंघातील सर्वजण त्यांना ओळखतात. वारकरी संप्रदायातील रितीरिवाज ते कटाक्षाने पाळतात.

परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू हरिभाऊ जाधव हे 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये परभणी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडून आले आहेत. त्यांची राजकारणाची सुरवात शिवसैनिक म्हणून झाली. परभणी नगरपरिषदेच्या सदस्यापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यानंतर परभणी विधानसभेचे ते दोन वेळा आमदार त्यानंतर परभणीचे विद्यमान खासदार आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या प्रखर विचारांचा कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची राज्यभरात ख्याती आहे. कडक व शिस्तप्रिय खासदार म्हणून मतदारसंघातील सर्वजण त्यांना ओळखतात. वारकरी संप्रदायातील रितीरिवाज ते कटाक्षाने पाळतात. दरवर्षी पत्नी क्रांती जाधव व खासदार संजय जाधव हे दोघे आषाढीवारीसाठी पायी पंढरपूरला जातात. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख