आजचा वाढदिवस : संदीप क्षीरसागर , युवा नेते - birthday of sandeep kshirsagar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : संदीप क्षीरसागर , युवा नेते

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

संदीप क्षीरसागर हे दिवंगत नेत्या केशरबाई क्षीरसागर यांचे नातू आहेत. पंचायत समितीच्या माध्यमातून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या संदीप क्षीरसागर यांनी पाच वर्षे बीड पंचायत समितीचे सभापती तर पाच वर्षे जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून काम केले. बीड मतदार संघात युवकांमध्ये क्रेझ असलेले संदीप क्षीरसागर यांनी काका आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार जयदत्त क्षीरसागर यांना राजकीय आव्हान देत "काकू - नाना' आघाडीच्या माध्यमातून त्यांनी बीड नगरपालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकीत स्वत:ची राजकीय ताकद दाखवून दिली. बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली 20 नगरसेवक विजयी झाले.

संदीप क्षीरसागर हे दिवंगत नेत्या केशरबाई क्षीरसागर यांचे नातू आहेत. पंचायत समितीच्या माध्यमातून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या संदीप क्षीरसागर यांनी पाच वर्षे बीड पंचायत समितीचे सभापती तर पाच वर्षे जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून काम केले. बीड मतदार संघात युवकांमध्ये क्रेझ असलेले संदीप क्षीरसागर यांनी काका आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार जयदत्त क्षीरसागर यांना राजकीय आव्हान देत "काकू - नाना' आघाडीच्या माध्यमातून त्यांनी बीड नगरपालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकीत स्वत:ची राजकीय ताकद दाखवून दिली. बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली 20 नगरसेवक विजयी झाले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्वत:सह आई व अन्य एक असे तीन जिल्हा परिषद सदस्य आणि आठ पंचायत समिती सदस्य विजयी झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवांच्या माध्यमातून त्यांचा शहरातील सामाजिक उपक्रमांत पुढाकार असतो. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख