आजचा वाढदिवस : बाळासाहेब सानप, आमदार, नाशिक पूर्व (भाजप) - birthday of sanap | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : बाळासाहेब सानप, आमदार, नाशिक पूर्व (भाजप)

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 30 जून 2018

आमदार बाळासाहेब सानप यांना कोणताही कौटुंबिक राजकीय वारसा नव्हता. सामान्य कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा होती. भारतीय जनता पक्षाला विविध निवडणुकांत घवघवीत यश मिळवून देणारे शहराध्यक्ष अशी त्यांची ओळख आहे. आपल्या मतदारसंघाच्या विकासाबरोबरच सामाजिक समतोल निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. गेली पस्तीस वर्षे ते राजकारणात सक्रिय आहेत. प्रारंभी कॉंग्रेस पक्षात ते सक्रिय होते. पंचवटी परिसरात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले. 1997 मध्ये ते भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून आले. 1998 मध्ये उपमहापौर, पक्षाचा गटनेता, वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष आणि 2015 मध्ये ते शहराचे महापौर झाले.

आमदार बाळासाहेब सानप यांना कोणताही कौटुंबिक राजकीय वारसा नव्हता. सामान्य कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा होती. भारतीय जनता पक्षाला विविध निवडणुकांत घवघवीत यश मिळवून देणारे शहराध्यक्ष अशी त्यांची ओळख आहे. आपल्या मतदारसंघाच्या विकासाबरोबरच सामाजिक समतोल निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. गेली पस्तीस वर्षे ते राजकारणात सक्रिय आहेत. प्रारंभी कॉंग्रेस पक्षात ते सक्रिय होते. पंचवटी परिसरात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले. 1997 मध्ये ते भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून आले. 1998 मध्ये उपमहापौर, पक्षाचा गटनेता, वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष आणि 2015 मध्ये ते शहराचे महापौर झाले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्य महापौर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. 2014 मध्ये ते नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून गेले. राज्याच्या भटके विमुक्त समाज समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. महाराष्ट्र हौसिंग फायनान्स फेडरेशनच्या संचालकपदी त्यांची निवड झाली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख