आजचा वाढदिवस : समीर मेघे - आमदार, भाजप (हिंगणा - नागपूर) - birthday of sameer meghe | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

आजचा वाढदिवस : समीर मेघे - आमदार, भाजप (हिंगणा - नागपूर)

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

विदर्भातील प्रभावी नेते व माजी खासदार दत्ता मेघे यांचे सुपुत्र असलेले समीर मेघे यांनी अल्पकाळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिंगणा (जि. नागपूर) मतदारसंघातून 2014 मध्ये पहिल्यांदा भाजपचे आमदार म्हणून निवडून आले. जनसंपर्क व विकास कामांमुळे ते अल्पावधीतच मतदारसंघात लोकप्रिय झाले. यामुळे या मतदारसंघातील नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकू शकला. कॉंग्रेसमधून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या समीर मेघे यांनी नागपूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. दत्ता मेघे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर समीर मेघे यांना हिंगणा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली होती.

विदर्भातील प्रभावी नेते व माजी खासदार दत्ता मेघे यांचे सुपुत्र असलेले समीर मेघे यांनी अल्पकाळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिंगणा (जि. नागपूर) मतदारसंघातून 2014 मध्ये पहिल्यांदा भाजपचे आमदार म्हणून निवडून आले. जनसंपर्क व विकास कामांमुळे ते अल्पावधीतच मतदारसंघात लोकप्रिय झाले. यामुळे या मतदारसंघातील नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकू शकला. कॉंग्रेसमधून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या समीर मेघे यांनी नागपूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. दत्ता मेघे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर समीर मेघे यांना हिंगणा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली होती. मृदूभाषी व विकासाची जाण व विवादांपासून दूर राहत असल्याने समीर मेघे यांनी लवकरच जिल्ह्यातील राजकारणात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख