आजचा वाढदिवस : खासदार छत्रपती संभाजीराजे - birthday of sambhajiraje | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : खासदार छत्रपती संभाजीराजे

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

राज्यसभा सदस्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा आज वाढदिवस. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक अशा विविध पदावर काम करणाऱ्या संभाजीराजे यांनी अलिकडे गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वाहून घेतले आहे. राज्य शासनाने "सारथी' संस्था बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर त्यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन जाब विचारला. मराठा समाजाला आरक्षण मिळवणे, सारथी सारख्या संस्थांची उभारणी यात त्यांचा पुढाकार राहीला. शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या विचारांचे वारस म्हणून राज्यभर त्यांची ओळख आहे.

राज्यसभा सदस्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा आज वाढदिवस. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक अशा विविध पदावर काम करणाऱ्या संभाजीराजे यांनी अलिकडे गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वाहून घेतले आहे. राज्य शासनाने "सारथी' संस्था बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर त्यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन जाब विचारला. मराठा समाजाला आरक्षण मिळवणे, सारथी सारख्या संस्थांची उभारणी यात त्यांचा पुढाकार राहीला. शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या विचारांचे वारस म्हणून राज्यभर त्यांची ओळख आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज भवानी मंडप येथे चित्रशिल्प प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. याच परिसरात थांबून त्यांनी आज दिवसभर कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख