आजचा वाढदिवस : रवी राणा, आमदार, बडनेरा. - birthday of ravi rana | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : रवी राणा, आमदार, बडनेरा.

सरकारनामा ब्युरो
रविवार, 28 एप्रिल 2019

रवी राणा यांचा जन्म अमरावती शहरात झाला. जुनी अमरावती परिसरातील तरखेडा भागात त्यांच घर होत. त्यांचे शालेय शिक्षण सरस्वती नगर शाळेत झाले आणि पदवी पर्यंतचे शिक्षण त्यांनी विदर्भ महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. घरची परिस्थिती जेमतेमच होती. बडनेरा विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून ते निवडून आले आहेत. आपल्या कारकिर्दीची सुरवात त्यांनी युवा स्वाभिमानी संघटनेच्या स्थापनेपासून केली. अभिनेत्री नवनीत कौर यांच्याशी एका सामूहिक विवाह सोहळ्यात ते विवाहबद्ध झाले. यामध्ये बाराशे जोडपी विवाहबद्ध झाली होती. हा सोहळा त्यावेळी खूप चर्चेत आलेला होता.

रवी राणा यांचा जन्म अमरावती शहरात झाला. जुनी अमरावती परिसरातील तरखेडा भागात त्यांच घर होत. त्यांचे शालेय शिक्षण सरस्वती नगर शाळेत झाले आणि पदवी पर्यंतचे शिक्षण त्यांनी विदर्भ महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. घरची परिस्थिती जेमतेमच होती. बडनेरा विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून ते निवडून आले आहेत. आपल्या कारकिर्दीची सुरवात त्यांनी युवा स्वाभिमानी संघटनेच्या स्थापनेपासून केली. अभिनेत्री नवनीत कौर यांच्याशी एका सामूहिक विवाह सोहळ्यात ते विवाहबद्ध झाले. यामध्ये बाराशे जोडपी विवाहबद्ध झाली होती. हा सोहळा त्यावेळी खूप चर्चेत आलेला होता. मेळघाटातील अनेक गरीब कुटुंबांना दैनंदिन गरजेच्या वस्तू ते मदत म्हणून देत असतात. त्यांच्या पत्नी अभिनेत्री नवनीत कौर राणा 2019 लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवार आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख