आजचा वाढदिवस - खासदार डॉ. प्रीतम मुंडे, भाजप - birthday of preetam munde | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस - खासदार डॉ. प्रीतम मुंडे, भाजप

सरकारनामा ब्युरो
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या द्वितीय कन्या आणि ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या धाकट्या भगिनी असलेल्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे या लोकसभा पोटनिवडणुकीत सहा लाख 96 हजार अशा विक्रमी मतांनी विजयी झाल्या. वैद्यकीय शाखेतील पदव्युत्तर (एमबीबीएस, एमडी डर्मेटॉलॉजी) पदवीधारक आहेत. नाशिक येथील अभियंता असलेल्या गौरव खाडे यांच्या त्या अर्धांगिनी आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्या वैद्यकीय व्यवसायात (सौंदर्यशास्त्र) कार्यरत होत्या. त्यापुर्वी त्यांचा राजकारणाशी कुठलाही प्रत्यक्ष संबंध नव्हता आणि त्यांनी कुठली निवडणुक लढविलेली नव्हती.

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या द्वितीय कन्या आणि ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या धाकट्या भगिनी असलेल्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे या लोकसभा पोटनिवडणुकीत सहा लाख 96 हजार अशा विक्रमी मतांनी विजयी झाल्या. वैद्यकीय शाखेतील पदव्युत्तर (एमबीबीएस, एमडी डर्मेटॉलॉजी) पदवीधारक आहेत. नाशिक येथील अभियंता असलेल्या गौरव खाडे यांच्या त्या अर्धांगिनी आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्या वैद्यकीय व्यवसायात (सौंदर्यशास्त्र) कार्यरत होत्या. त्यापुर्वी त्यांचा राजकारणाशी कुठलाही प्रत्यक्ष संबंध नव्हता आणि त्यांनी कुठली निवडणुक लढविलेली नव्हती. मात्र, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अकाली दुर्दैवी निधनाने रिक्त झालेल्या बीड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत ऐनवेळी उमेदवार म्हणून त्या पुढे आल्या. लोकसभेच्या सदस्यत्वासह त्या वैद्यनाथ नागरी सहकारी बॅंकेच्या संचालिका, सोलापूर येथील लिंगराज वल्ल्याळ दंत महाविद्यालयाच्या अध्यक्षा, जिल्हा शालेय सुधारणा समितीच्या अध्यक्षा तसेच लोकसभेच्या रेल्वे सल्लागार, ओबीसी कल्याण व स्थाई उर्जा या समित्यांच्या त्या सदस्या आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख