आजचा वाढदिवस : प्रवीण माने (आरोग्य व बांधकाम सभापती, पुणे झेडपी) - birthday : Pravin Mane | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : प्रवीण माने (आरोग्य व बांधकाम सभापती, पुणे झेडपी)

राजकुमार थोरात
सोमवार, 17 जून 2019

अडीच वर्षापूर्वी व्यवसायामध्ये गर्ग असलेला प्रवीण माने यांनी अचानक राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेवून फेब्रुवारी २०१७ मध्ये पळसदेव-बिजवडी गटातुन जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून जिंकली. पवार कुंटूबाने प्रवीण माने यांना झेडपी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापतीचे महत्वाचे पद दिले. आरोग्य खात्यामध्ये अनेक महत्वाचे बदल करुन पुणे जिल्हा परिषदेचे नाव राज्यामध्ये झळकवले.

चोवीस तास ऑन ड्युटीप्रमाणेच प्रविण माने कार्यरत राहीले. आशा वर्कर्स या समाजासाठीच झटतात हे मनात ठसवून त्यांनी आशा स्वयंसेविकांचे मानधन वाढविण्याचा निर्णय घेतला. इंदापूर तालुक्यासाठी २०० कोटी रुपयांपेक्षा  जास्त भरघोसविकास निधी आणला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी दिव्यांग बांधवांना बारामती, दौंड, सासवड व आंबेगाव येथे प्रमाणपत्र देण्याची सुविधा कार्यरत केली. यामुळे दिव्यांगांचे हेलपाटे वाचले. जिल्ह्यातील रिक्त असलेल्या अर्ध परिचारिकांच्या जागा तात्काळ भरल्या. 

प्राथमिक आरोग्य केंद्र एका क्लिकवर ही संकल्पना त्यांनी राबवली. त्यासाठी डिजीटल पीएचसी या नावाचे मोबाईल अॅप तयार केले. त्यामुळे रुग्णास घरबसल्या सरकारी दवाखान्यात बाह्यरुग्ण विभागामध्ये उपचारासाठी नोंदणी करता येऊ लागली. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख