आजचे वाढदिवस - पोपटराव पवार, प्रमोद यादव

सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार आणि साताऱयाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा परिचय...
आजचे वाढदिवस - पोपटराव पवार, प्रमोद यादव

पोपटराव पवार (सामाजिक कार्यकर्ते) 
जन्म  1 जून 1960 
सध्याचे पद - कार्याध्यक्ष, आदर्शगाव योजना व कृती समिती 
सामाजिक कार्यकर्ते म्हणून देशभर प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्त्व. आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच पदापासून सामाजिक क्षेत्रात कार्याला प्रारंभ. गावाला देशपातळीवर नेणारा कार्यकर्ता. नगर तालुका पंचायत समितीचे सदस्य, नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, जलसंधारण परिषदेचे कार्यकारी समिती सदस्य, संत तुकाराम वनग्राम समिती सदस्य, आंध्रप्रदेश ग्रामविकास समितीचे तज्ज्ञ मार्गदर्शक, कपार्टचे सदस्य (भारत सरकार) अशी विविध पदे यांनी भूषविली. राष्ट्रीय उत्पादकता पुरस्कार, प्रथम राष्ट्रीयजल पुरस्कार, कृषिरत्न पुरस्कार, वनश्री पुरस्कार, संत तुकाराम वनग्राम पुरस्कार असे अनेक देशपातळीवरील पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 

प्रमोद यादव (अतिरिक्त जिल्हाधिकारी, सातारा) 
जन्म : 1 जुन, 1969. 
मुळचे पुणे जिल्ह्यातील सासवडचे आहेत. त्यांची प्रशासकिय कारकिर्द पोलिस अधिकारी म्हणून झाली. 1985 मध्ये ते पोलिस उपनिरिक्षक झाले. साधारण पाच वर्षे त्यांची नाशिक जिल्ह्यात सेवा झाली. त्यानंतर आपला मार्ग बदलत प्रशासकिय सेवेत आले. मुख्याधिकारी पदापासून सुरवात झाली. 1994 मध्ये ते उपजिल्हाधिकारी झाले. त्यानंतर साताऱ्याचे पुनर्वसन अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सध्या ते अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून साताऱ्यात कार्यरत आहेत. घनकचरा निर्मूलन, सातबारावरील पुनर्वसनाचे शिक्के उठविणे, पूनर्वसनाची कामे 99 टक्के त्यांनी पूर्ण केली आहेत. उरमोडी, तारळीचे पूनर्वसन अंतिम टप्प्यात आणले आहे. त्यांना फोटोग्राफिचा छंद आहे. उत्कृष्ट बॅडमिंटनपट्टू असून आतापर्यंत त्यांनी तीन गोल्डमेडल मिळविलेले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com