आजचा वाढदिवस : आमदार नारायण कुचे - भाजप, बदनापूर मतदारसंघ - birthday of narayan kuche | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : आमदार नारायण कुचे - भाजप, बदनापूर मतदारसंघ

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 5 मार्च 2019

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना नारायण कुचे यांनी औरंगाबाद महापालिकेचे नगरसेवकपद ते बदनापूर - अंबड विधानसभा मतदार संघाचे आमदार असा राजकीय प्रवास केला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजप - शिवसेनेची तुटलेली युती त्यांच्या पथ्यावरच पडली. उमेदवारी दाखल केल्यानंतर अवघ्या तेरा दिवसांत ते भाजपच्या तिकिटावर आमदार झाले. नारायण तिलोकचंद कुचे यांचा जन्म 5 मार्च 1974 रोजी झाला. औरंगाबाद येथील मुकुंदवाडीत वास्तव्यास असलेल्या कुचे कुटुंबातील कुणीही राजकारणात नव्हते. मात्र नारायण कुचे यांनी भारतीय जनता पक्षाचे काम करण्यास सुरुवात केली.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना नारायण कुचे यांनी औरंगाबाद महापालिकेचे नगरसेवकपद ते बदनापूर - अंबड विधानसभा मतदार संघाचे आमदार असा राजकीय प्रवास केला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजप - शिवसेनेची तुटलेली युती त्यांच्या पथ्यावरच पडली. उमेदवारी दाखल केल्यानंतर अवघ्या तेरा दिवसांत ते भाजपच्या तिकिटावर आमदार झाले. नारायण तिलोकचंद कुचे यांचा जन्म 5 मार्च 1974 रोजी झाला. औरंगाबाद येथील मुकुंदवाडीत वास्तव्यास असलेल्या कुचे कुटुंबातील कुणीही राजकारणात नव्हते. मात्र नारायण कुचे यांनी भारतीय जनता पक्षाचे काम करण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम पक्षाने त्यांची भाजप चिकलठाणा मंडळाच्या सरचिटणीस पदावर नियुक्ती केली. पुढे 2005 मध्ये औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून अंबिकानगर प्रभागातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला आणि कुचे नगरसेवक झाले. 2010 च्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीत ते मुकुंदवाडी प्रभागातूनही निवडून आले. त्यांना स्थायी समितीचे सभापतीपदही देण्यात आले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप - शिवसेनेची युती तुटली. त्यामुळे पहिल्यांदाच भाजपला बदनापूर - अंबड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी लागली. आमदार कुचे यांची खासदार रावसाहेब दानवे यांनी पक्षाकडे शिफारस करून त्यांना अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या बदनापूर - अंबड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आणि ते निवडून आले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख