birthday of mukta tilak | Sarkarnama

आजचा वाढदिवस : मुक्ता टिळक, महापौर , पुणे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

पुणे : पुणे महापालिकेत सलग चारवेळा नगरसेविका, महापालिकेतील गटनेत्या, सध्या महापौरपदी काम करत आहेत. महापालिकेत विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या मुक्ता टिळक यांचा आज वाढदिवस. सुरवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टीशी संबंधित असलेल्या मुक्ता टिळक यांनी सामाजिक व राजकीय जीवनात आपली स्वच्छ प्रतिमा राखली आहे. त्याचाच परिणाम म्हणून त्यांना पक्षाने सतत चांगली संधी दिली. सलग चारवेळा नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी पक्षाने दिलेल्या संघटनात्मक जबाबदाऱ्या वेळोवेळी सांभाळल्या आहेत. अडीच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले.

पुणे : पुणे महापालिकेत सलग चारवेळा नगरसेविका, महापालिकेतील गटनेत्या, सध्या महापौरपदी काम करत आहेत. महापालिकेत विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या मुक्ता टिळक यांचा आज वाढदिवस. सुरवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टीशी संबंधित असलेल्या मुक्ता टिळक यांनी सामाजिक व राजकीय जीवनात आपली स्वच्छ प्रतिमा राखली आहे. त्याचाच परिणाम म्हणून त्यांना पक्षाने सतत चांगली संधी दिली. सलग चारवेळा नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी पक्षाने दिलेल्या संघटनात्मक जबाबदाऱ्या वेळोवेळी सांभाळल्या आहेत. अडीच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले. महापालिकेत पक्षाची प्रथमच सत्ता आल्यानंतर भाजपाच्या पहिला महापौर होण्याचा मान टिळक यांना मिळाला. सलग अडीच वर्षे त्या महापौर आहेत. येत्या विधानसभेला कसबा विधानसभा मतदारसंघातून टिळक यांचे नाव आघाडीवर आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख