Birthday : MLA Sangita Thombre , BJP , Kej constituency | Sarkarnama

आजचा वाढदिवस : आमदार संगीता ठोंबरे- भाजप (केज विधानसभा मतदारसंघ) 

सरकारनामा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

2012 च्या केज विधानसभा निवडणुकीत भाजपकडून संगीता ठोंबरे यांना उमेदवारी मिळाली, पण त्यांचा 8 हजार मतांनी पराभव झाला. 2014 मध्ये पक्षाने पुन्हा त्यांच्यावर विश्‍वास दाखवला आणि त्या विजयी झाल्या. 

बीडः केज विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार संगीता ठोंबरे यांचा आज (ता.15) वाढदिवस. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1977 ला झाला. शालेय शिक्षण दिल्लीत पुर्ण केल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण व बी.ए., एम.ए. ची पदवी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून घेतली. तर बीएड त्यांनी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातून पुर्ण केले. 

प्राध्यापक म्हणून त्यांनी राजाराम कॉलेज कोल्हापूर, चाटे कोचिंग क्‍लासेस, सुयश केंद्रीय विद्यालय सोलापूर, देशभक्त हरिनारायण सोनी कॉलेज सोलापूर, जेएसपीएस इन्स्टीट्यूट पुणे आणि खोलेश्‍वर महाविद्याल अंबाजोगाई येथे 2000 ते 2014 दरम्यान केले. 

29 मे 1994 रोजी त्यांच्या विवाह डॉ. विजयप्रकाश कृष्णराव ठोंबरे यांच्याशी झाला. ते महात्मा ज्योतीबा फुले कृषी विद्यापीठ राहूरी येथे प्रोफेसर होते. दरम्यान राजकारणात देखील ते सक्रीय होते. संगीता ठोंबरे यांचे सासरे कृष्णराव ठोंबरे यांनी देखील 1984 मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. 

2012-13 दरम्यान, संगीता ठोंबरे या राजकारणात सक्रीय झाल्या. सुरूवातीला भाजप प्रदेश कार्यकारणीत त्यांची सदस्य म्हणून निवड झाली. महाराष्ट्र राज्य युवती आघाडी आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवले. 

2012 च्या केज विधानसभा निवडणुकीत भाजपकडून संगीता ठोंबरे यांना उमेदवारी मिळाली, पण त्यांचा 8 हजार मतांनी पराभव झाला. 2014 मध्ये पक्षाने पुन्हा त्यांच्यावर विश्‍वास दाखवला आणि त्या विजयी झाल्या. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख