आजचा वाढदिवस : आमदार मकरंद पाटील, वाई , राष्ट्रवादी कॉंग्रेस.

आजचा वाढदिवस : आमदार मकरंद पाटील, वाई , राष्ट्रवादी कॉंग्रेस.

वाई- महाबळेश्‍वर- खंडाळा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार असलेले मकरंद पाटील यांचे मुळगाव बोपेगांव (ता. वाई) असून ते डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअर आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव असल्याने त्यांच्यामागे मोठा राजकीय वारसा आहे. महाविद्यालयीन जीवनात ते विद्यार्थी प्रतिनिधी होते, त्यानंतर बोपेगावचे सरपंच झाले. ओझर्डे गटातून ते जिल्हा परिषद सदस्य झाले. 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वाई मतदारसंघातून त्यांनी मदन 
भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढली व तेथे त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2009 मध्ये वाई-महाबळेश्‍वर-खंडाळा मतदारसंघातून प्रथम आमदार म्हणून 
निवडून आले. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा 2014 मध्ये याच मतदारसंघातून आमदार झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com