आजचा वाढदिवस : गिरीश महाजन, जलसंपदा व वैद्यकिय आरोग्य शिक्षणमंत्री - birthday of mahajan | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : गिरीश महाजन, जलसंपदा व वैद्यकिय आरोग्य शिक्षणमंत्री

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 17 मे 2019

गिरीश महाजन हे भारतीय जनता पक्षाचे जामनेर (जि. जळगाव) मतदार संघाचे आमदार आहेत. पाचवेळा ते याच मतदार संघातून निवडून येत आहेत. महाजन यांचे वडील दत्तात्रेय महाजन जामनेर येथे शिक्षक होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात झाली आहे. 

1978 मध्ये गिरीश महाजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. विद्यार्थी दशेतच त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे सदस्यपद घेतले. आपल्या कामाच्या बळावर ते युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष झाले. 1992 मध्ये त्यांनी जामनेर ग्रामपंचायत सदस्यपदाची निवडणूक लढवून ते निवडून आले. त्याच वर्षी ते जामनेरचे सरपंचही झाले. सन 1985 मध्ये जामनेर विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षातर्फे ते निवडून आले. त्यात सतत पाच वेळा ते याच मतदार संघातून विजयी झाले आहेत. 2014 मध्ये राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार आल्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. जलसंपदा व वैद्यकिय आरोग्य शिक्षणमंत्री ही महत्वाची खाती त्यांना देण्यात आली. या शिवाय नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही त्यांच्याकडे देण्यात आले. नाशिक येथे झालेल्या कुंभमेळ्याचे शासकीय पातळीवर त्यांनी चांगले नियोजन केले होते. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख