आजचा वाढदिवस : कृपाल तुमाने, खासदार (रामटेक)  - birthday of krupal tumane | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : कृपाल तुमाने, खासदार (रामटेक) 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 1 जून 2018

रामटेक येथील खासदार कृपाल तुमाने यांची राजकीय कारकीर्द कॉंग्रेसपासून सुरवात झाली. नागपूर शहर कॉंग्रेस व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसमध्ये विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. 2008 मध्ये मात्र त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला व 2009 मध्ये रामटेक येथील लोकसभा निवडणूक लढविली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ मंत्री मुकुल वासनिक यांच्या विरोधात तुमाने यांना पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतरही तुमाने यांनी मतदारसंघातील संपर्क कायम ठेवला. 2014 मध्ये पुन्हा शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांनी मुकुल वासनिक यांचा पराभव करून कॉंग्रेसकडून हा मतदारसंघ शिवसेनेकडे ओढून आणला.

रामटेक येथील खासदार कृपाल तुमाने यांची राजकीय कारकीर्द कॉंग्रेसपासून सुरवात झाली. नागपूर शहर कॉंग्रेस व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसमध्ये विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. 2008 मध्ये मात्र त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला व 2009 मध्ये रामटेक येथील लोकसभा निवडणूक लढविली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ मंत्री मुकुल वासनिक यांच्या विरोधात तुमाने यांना पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतरही तुमाने यांनी मतदारसंघातील संपर्क कायम ठेवला. 2014 मध्ये पुन्हा शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांनी मुकुल वासनिक यांचा पराभव करून कॉंग्रेसकडून हा मतदारसंघ शिवसेनेकडे ओढून आणला. संपर्क ठेवणारे व मितभाषी नेता म्हणून तुमाने प्रसिद्ध आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख