birthday of kirit somaiya | Sarkarnama

आजचा वाढदिवस : किरीट सोमैया, खासदार ईशान्य मुंबई

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

किरीट सौमैया हे सध्याच्या लोकसभेचे सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ सदस्य असलेल्या सोमैया ह्यांनी 1999 मध्ये लोकसभेत प्रवेश केला त्यापूर्वी 1995 मध्ये ते विधानसभेचे सदस्य होते. 99 मध्ये लोकसभेत प्रवेश केलेल्या सोमैया यांनी अत्यंत सक्रीय राहून आपली खासदारकीची कारकीर्द गाजवली होती. 1975 मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत सहभागी झालेल्या सोमैया यांनी नंतर भारतीय जनता पक्षाचे काम सुरू केले. चार्टड अकौटंट असलेल्या सोमैया यांनी फायनान्स या विषयात डॉक्‍टरेट मिळवलेली आहे. सध्याच्या लोकसभेतही त्यांनी लक्षणीय कामगिरी बजावली आहे.

किरीट सौमैया हे सध्याच्या लोकसभेचे सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ सदस्य असलेल्या सोमैया ह्यांनी 1999 मध्ये लोकसभेत प्रवेश केला त्यापूर्वी 1995 मध्ये ते विधानसभेचे सदस्य होते. 99 मध्ये लोकसभेत प्रवेश केलेल्या सोमैया यांनी अत्यंत सक्रीय राहून आपली खासदारकीची कारकीर्द गाजवली होती. 1975 मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत सहभागी झालेल्या सोमैया यांनी नंतर भारतीय जनता पक्षाचे काम सुरू केले. चार्टड अकौटंट असलेल्या सोमैया यांनी फायनान्स या विषयात डॉक्‍टरेट मिळवलेली आहे. सध्याच्या लोकसभेतही त्यांनी लक्षणीय कामगिरी बजावली आहे. छोट्या गुंतवणूकदरांच्या हितासाठी ते गेली अनेक वर्षे कार्यरतआहेत. आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आरोग्यशिबिर घेऊन तसेच विविध उपक्रम राबवून त्यांनी चांगला जनसंपर्क ठेवला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख