आजचा वाढदिवस : जयदत्त क्षीरसागर - माजी मंत्री.

आजचा वाढदिवस : जयदत्त क्षीरसागर - माजी मंत्री.

दिवंगत लोकनेत्या केशरबाई क्षीरसागर यांचे जेष्ठ चिरंजीव आणि शिवसेनेत असलेले जयदत्त क्षीरसागर यांचा राजकीय प्रवास जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचे कॅबीनेट मंत्री असा राहीलेला आहे.  मराठवाड्यातील मातब्बर ओबीसी नेते अशी ओळख असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून राजकीय फडात प्रवेश केला. 

जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपमंत्री, राज्यमंत्री आणि कॅबीनेट मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहीला. चार वेळा आमदार असलेले जयदत्त क्षीरसागर काँग्रेसमध्ये असताना उपमंत्री व नंतर राज्यमंत्री होते. तर आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री व विविध खात्यांचे कॅबीनेटमंत्री अशा पदांवर त्यांनी काम केले. भूविकास बँकेचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक, राज्य मार्केटींग फेडरेशनचे संचालक, जिल्हा खो - खो असोसिएशनचे अध्यक्ष यासह ते गजानन सहकारी सुतगिरणी, गजानन सहकारी बँकेचेही अध्यक्ष आहेत. अनंत कृषी प्रतिष्ठान, विनायक युवक प्रतिष्ठान तसेच आदर्श व नवगण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जिल्हाभरात शिक्षण संस्थांचे जाळे उभारले आहे. अखिल भारतीय तौलिक महासभेचे ते अध्यक्ष
आहेत. आघाडी सरकारच्या काळात जयदत्त क्षीरसागर उर्जा मंत्री असतानाच शेतकऱ्यांना वीज बील माफीचा निर्णय झाला
होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com