आजचा वाढदिवस : आमदार जे. पी. गावीत, कळवण- सुरगाणा - birthday of j p gavit | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : आमदार जे. पी. गावीत, कळवण- सुरगाणा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 डिसेंबर 2018

जीवा पांडू गावीत हे महाराष्ट्राच्या तेराव्या विधानसभेतील डाव्या पक्षाचे एकमेव आमदार आहेत. नाशिक जिल्ह्यात विविध प्रश्‍नांवर मोठे मोर्चे काढले आहेत. औरंगाबाद येथे शिक्षण घेत असतांनाच वसतिगृहातील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यावेळी साम्यवादी चळवळ जोरात होती. डाव्या पक्षांनी काढलेल्या मोर्चात त्यांनी आघाडी घेतली. सुरगाण्याला मुळ गावी आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीत सक्रीय झाले. श्री. गावित 1978 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. तेव्हापासून सुरगाणा या आदिवासी राखीव मतदारसंघातून सात वेळा ते आमदार म्हणून निवडून गेले आहेत.

जीवा पांडू गावीत हे महाराष्ट्राच्या तेराव्या विधानसभेतील डाव्या पक्षाचे एकमेव आमदार आहेत. नाशिक जिल्ह्यात विविध प्रश्‍नांवर मोठे मोर्चे काढले आहेत. औरंगाबाद येथे शिक्षण घेत असतांनाच वसतिगृहातील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यावेळी साम्यवादी चळवळ जोरात होती. डाव्या पक्षांनी काढलेल्या मोर्चात त्यांनी आघाडी घेतली. सुरगाण्याला मुळ गावी आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीत सक्रीय झाले. श्री. गावित 1978 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. तेव्हापासून सुरगाणा या आदिवासी राखीव मतदारसंघातून सात वेळा ते आमदार म्हणून निवडून गेले आहेत. वनजमिनींचा लढा, आदिवासीचे प्रश्‍न आणि शेतमजुरांच्या प्रश्‍नावर सरकारविरोधात आक्रमकरित्या सातत्याने संघर्ष करीत आले आहेत. गतवर्षी वनजमिनी नावे करण्यात याव्यात यासाठी त्यांनी नाशिक ते मुंबई लॉंग मार्च काढल्याने ते विशेष चर्चेत आले. या विषयाचा ते अद्यापही पाठपुरावा करीत आहेत. सध्या ते किसान सभेचे राज्य अध्यक्ष आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख