आजचा वाढदिवस : गुलाबराव पाटील - सहकारराज्यमंत्री, शिवसेना उपनेते - birthday of gulabrav patil | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : गुलाबराव पाटील - सहकारराज्यमंत्री, शिवसेना उपनेते

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 5 जून 2018

गुलाबराव पाटील यांचा पानटपरी चालक ते सहकारराज्यमंत्री असा राजकीय प्रवास आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मतदार संघाचे शिवसेनेचे ते आमदार आहेत. तसेच शिवसेना उपनेते व राज्याचे सहकारराज्यमंत्रीही ते आहेत. जळगावजवळच्या पाळधी गावात "नशीब पान सेंटर दुकान' आहे. याच दुकानातून त्यांना राजकीय दिशा मिळाली. आपल्या वक्तृत्वशैलीमुळे त्यांनी राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. जळगाव जिल्हा हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. 1985 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या कालावधीत त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्‍न हाताळले.

गुलाबराव पाटील यांचा पानटपरी चालक ते सहकारराज्यमंत्री असा राजकीय प्रवास आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मतदार संघाचे शिवसेनेचे ते आमदार आहेत. तसेच शिवसेना उपनेते व राज्याचे सहकारराज्यमंत्रीही ते आहेत. जळगावजवळच्या पाळधी गावात "नशीब पान सेंटर दुकान' आहे. याच दुकानातून त्यांना राजकीय दिशा मिळाली. आपल्या वक्तृत्वशैलीमुळे त्यांनी राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. जळगाव जिल्हा हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. 1985 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या कालावधीत त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्‍न हाताळले. वीज प्रश्‍नावर त्यांनी "शिंगाडे मोर्चा'काढला. त्यांच्या विविध आंदोलनामुळे ते आजूबाजूच्या परिसरात प्रसिद्ध झाले. नंतर त्यांना खानदेशची मुलूख मैदान तोफ'असे संबोधले जावू लागले. 1992 मध्ये ते पंचायत समिती सदस्य तर 1997 मध्ये जिल्हा परिषद सदस्य झाले. 1999 मध्ये ते शिवसेनेचे आमदार झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते दुसऱ्यांदा निवडून आले. मात्र  2009 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. तर 2014 मध्ये ते पुन्हा जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेनेतर्फेच आमदार झाले. 2016 मध्ये भाजप सेना युतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांना सहकाराज्यमंत्रीपदाची संधी मिळाली. तसेच परभणीचे पालकमंत्रीपदही त्यांना मिळाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख