birthday of ganesh naik | Sarkarnama

आजचा वाढदिवस : गणेश नाईक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री.

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

आमदार गणेश नाईक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच माजी मंत्री आहेत. नवी मुंबईचे नेते म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. बेलापूर मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. नाईक यांच्या राजकारणाला खऱ्या अर्थाने सुरवात शिवसेनेत झाली. या पक्षाचे नेते म्हणूनही ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित होते. युतीच्या काळात ते वनमंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. पुढे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राज्यात आघाडीचे सरकार सत्तेवर येताच ते पुन्हा मंत्री बनले. ठाणे व नवी मुंबई भागात या पक्षाचे स्थान बळकट करण्यात नाईक यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

आमदार गणेश नाईक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच माजी मंत्री आहेत. नवी मुंबईचे नेते म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. बेलापूर मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. नाईक यांच्या राजकारणाला खऱ्या अर्थाने सुरवात शिवसेनेत झाली. या पक्षाचे नेते म्हणूनही ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित होते. युतीच्या काळात ते वनमंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. पुढे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राज्यात आघाडीचे सरकार सत्तेवर येताच ते पुन्हा मंत्री बनले. ठाणे व नवी मुंबई भागात या पक्षाचे स्थान बळकट करण्यात नाईक यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. नाईक यांची दुसरी ओळख कामगार नेते म्हणूनही आहे. श्रमिक सेनेच्या माध्यमातून त्यांनी लाखो कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. या संघटनेच्या नावाने त्यांनी केवळ ठाणे मुंबईतच नव्हे तर राज्यभर रूग्णवाहिकांचे मोफत वाटप केले होते. राजकारणाला त्यांनी समाजकारणाची जोड दिली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांना पालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. नवी मुंबईच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख