आजचा वाढदिवस : डॉ. सुनील देशमुख, भाजप आमदार (अमरावती) - birthday of dr sunil deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : डॉ. सुनील देशमुख, भाजप आमदार (अमरावती)

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 मे 2018

विद्यार्थी चळवळीतून डॉ. सुनील देशमुख यांचे नेतृत्व समोर आले. विदर्भातील नेते डॉ. श्रीकांत जिचकार यांच्यासमवेत त्यांनी राजकारण केले. त्यांच्यासोबत त्यांनी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेतले. त्याचवेळी ते विद्यार्थी चळवळीत होते. नागपूर विद्यापीठाच्या छात्रसंघाचे ते अध्यक्ष राहिले आहेत. युवक कॉंग्रेसचे नेतृत्वही त्यांनी केले. अमरावती मतदारसंघातून त्यांनी कॉंग्रेसचे प्रतिनिधित्व केले. अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख आहे. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थराज्यमंत्री होते. 2009 मध्ये कॉंग्रेसने त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी बंडखोरी केली होती.

विद्यार्थी चळवळीतून डॉ. सुनील देशमुख यांचे नेतृत्व समोर आले. विदर्भातील नेते डॉ. श्रीकांत जिचकार यांच्यासमवेत त्यांनी राजकारण केले. त्यांच्यासोबत त्यांनी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेतले. त्याचवेळी ते विद्यार्थी चळवळीत होते. नागपूर विद्यापीठाच्या छात्रसंघाचे ते अध्यक्ष राहिले आहेत. युवक कॉंग्रेसचे नेतृत्वही त्यांनी केले. अमरावती मतदारसंघातून त्यांनी कॉंग्रेसचे प्रतिनिधित्व केले. अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख आहे. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थराज्यमंत्री होते. 2009 मध्ये कॉंग्रेसने त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी बंडखोरी केली होती. अमरावती मतदारसंघातून 2014 मध्ये त्यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे सुपुत्र रावसाहेब शेखावत यांचा त्यांनी पराभव केला. एक अभ्यासू व विकास कामे करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. अमरावतीमध्ये झालेल्या विकास कामांमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख