birthday of dada jadhavrao | Sarkarnama

आजचा वाढदिवस : दादा जाधवराव, माजी मंत्री

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 23 जुलै 2018

पुणे जिल्ह्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघातून तब्बल सहावेळा कायम विरोधी पक्षातून आमदार म्हणून निवडून आलेले दादा जाधवराव यांचा आज 84 वा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या हस्ते आज त्यांचा सासवड येथे सत्कार करण्यात आला. दादा जाधवराव हे कायम कॉंग्रेसविरोधी राहिले आहेत. समाजवादी विचारांशी त्यांची बांधीलकी आहे. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार व राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री अशी त्यांची यशाची चढती कमान राहिली आहे. गेली तब्बल 50 वर्षे ते राजकारणात आहेत.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघातून तब्बल सहावेळा कायम विरोधी पक्षातून आमदार म्हणून निवडून आलेले दादा जाधवराव यांचा आज 84 वा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या हस्ते आज त्यांचा सासवड येथे सत्कार करण्यात आला. दादा जाधवराव हे कायम कॉंग्रेसविरोधी राहिले आहेत. समाजवादी विचारांशी त्यांची बांधीलकी आहे. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार व राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री अशी त्यांची यशाची चढती कमान राहिली आहे. गेली तब्बल 50 वर्षे ते राजकारणात आहेत. सुरवातीला प्रजा समाजवादी पक्ष, जनता पक्ष त्यानंतर गेली अनेक वर्षे जनता दल (सेक्‍युलर) या माध्यमातून ते काम करीत आहेत. मात्र वयोमानामुळे गेल्या काही वर्षापासून ते राजकारणापासून काहीसे अलिप्त आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख