आजचा वाढदिवस : चंद्रकांत खैरे , शिवसेना नेते, औरंगाबाद - birthday of chandkrant khaire | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : चंद्रकांत खैरे , शिवसेना नेते, औरंगाबाद

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 जानेवारी 2020

औरंगाबाद : चंद्रकांत खैरे यांनी डेक्कन फ्लोअरमिलमध्ये सुपरवायझर म्हणून सुरूवातीला नोकरी केली. त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांनी प्रभावित होऊन खैरेंनी औरंगाबाद शहरात शिवसेनेचे काम सुरू केले. अगदी मराठवाड्यातील शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करण्यात देखील त्यांच्या महत्वाचा वाटा होता. शिवसेनेचे पदाधिकारी, महापालिकेत नगरसेवक, विरोधीपक्ष नेता अशी त्यांची राजकीय वाटचाल. मुंबईनंतर शिवसेनेने मराठवाड्यात औरंगाबादेतून विस्ताराला सुरूवात केली तेव्हा चंद्रकांत खैरे यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 

संघटना वाढीचे काम केल्यानंतर शिवसेनेकडून खैरेंना सर्वप्रथम 1990 मध्ये विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवत त्यांनी औरंगाबादेत शिवसेनेचे अस्तित्व सिध्द केले. 1995 मध्ये पुन्हा विधानसभेवर निवडून गेलेल्या चंद्रकांत खैरे यांना युती सरकारमध्ये कॅबिनेटमंत्रीद मिळाले. परिवहन, गृहनिर्माण, वन व पर्यावरण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून खैरे यांनी जबादारी पार पाडली. दोनवेळा आमदार झाल्यानंतर 1999 मध्ये पक्षाने त्यांना बढती देत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. विधानसभे प्रमाणेच त्यांनी लोकसभेची पहिलीच निवडणूकही मोठ्या मताधिक्‍यांने जिंकली. सलग चार लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचा विक्रम देखील त्यांच्या नावावर आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख