birthday of chabukswar | Sarkarnama

आजचा वाढदिवस : अॅड. गौतम चाबुकस्वार, आमदार - पिंपरी.

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

अॅड. गौतम चाबुकस्वार हे पिंपरीचे आमदार आहेत. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मधून सध्या शिवसेनेचे ते एकमेव आमदार आहेत. त्यापूर्वी ते पाच वेळा (1986 ते 2012) कॉंग्रेसचे नगरसेवक होते. उद्योगनगरीचे उपमहापौरपदही त्यांनी भूषविलेले आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे ते सदस्यही होते. बौद्ध धर्माचे अभ्यासक असलेले चाबूकस्वार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पाली भाषा शिकवितात. नगरसेवक असताना 1998 पासून त्यांनी सुरू केलेले हे पाली भाषेचे वर्ग आमदार झाल्यानंतरही सुरूच आहेत. वकील, प्राध्यापक असलेले चाबुकस्वार हे उच्चशिक्षित आमदार आहेत. बीकॉम, एमए, एलएलबी, एमफील अशा चार पदव्या त्यांच्याकडे आहेतही.

अॅड. गौतम चाबुकस्वार हे पिंपरीचे आमदार आहेत. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मधून सध्या शिवसेनेचे ते एकमेव आमदार आहेत. त्यापूर्वी ते पाच वेळा (1986 ते 2012) कॉंग्रेसचे नगरसेवक होते. उद्योगनगरीचे उपमहापौरपदही त्यांनी भूषविलेले आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे ते सदस्यही होते. बौद्ध धर्माचे अभ्यासक असलेले चाबूकस्वार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पाली भाषा शिकवितात. नगरसेवक असताना 1998 पासून त्यांनी सुरू केलेले हे पाली भाषेचे वर्ग आमदार झाल्यानंतरही सुरूच आहेत. वकील, प्राध्यापक असलेले चाबुकस्वार हे उच्चशिक्षित आमदार आहेत. बीकॉम, एमए, एलएलबी, एमफील अशा चार पदव्या त्यांच्याकडे आहेतही. मुष्टियुद्ध स्पर्धेत त्यांनी राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केलेली आहे. वाचन, लेखन, चिंतन आणि ध्यानधारणेची त्यांना आवड आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख