आजचा वाढदिवस : भीमराव तापकीर, आमदार भाजप - birthday of bhimrav tapkir | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : भीमराव तापकीर, आमदार भाजप

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

पुणे महापालिकेत दोन टर्म नगरसेवक त्यानंतर दोन वेळा आमदार असलेल्या भीमराव तापकीर यांनी कात्रज-देहूरस्ता बाह्यवळण मार्गावरील चांदणी चौकातील उड्डाण पूल मार्गी लावण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. चांदणी चौकातील हा पूल कोथरूड परिसरात असला तरी खडकवासला विधानसभा मतदारसंघात मोडतो. त्यामुळे उड्डाण पुलाचे काम सुरू व्हावे, त्यासाठी आवश्‍यक असलेला भूसंपादनासाठीचा निधी राज्य सरकारकडून मिळविण्यात कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्याबरोबरच आमदार तापकीर यांनीही प्रयत्न केले आहेत. त्यामुळे भूसंपादनासाठी राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी 185 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. 

आमदार तापकीर 2002 साली पुणे महापालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 2007 च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा महापालिकेत यश मिळविले. खडकवासला मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार रमेश वांजळे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या जागी झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्यावतीने तापकीर यांना संधी मिळाली. पोटनिवडणुकीच्या माध्यमातून निवडून त्यांना अडीच वर्षाची टर्म मिळाली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा आमदारकीची संधी मिळाली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख