आजचा वाढदिवस : अशोक उईके - आमदार (राळेगाव, यवतमाळ) 

आजचा वाढदिवस : अशोक उईके - आमदार (राळेगाव, यवतमाळ) 

भाजपचा सामान्य कार्यकर्ता ते आमदार असा प्राचार्य अशोक उईके यांचा राजकीय प्रवास झाला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. वसंतराव पुरके यांचा पराभव करून त्यांनी भाजपसाठी हा मतदारसंघ खेचून आणला. प्राचार्य डॉ. अशोक उईके राळेगाव विधानसभेतून 2014 आमदार झाले. ते विधानमंडळाचे अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आहेत. नुकतीच त्यांनी राळेगाव येथे बिरसा मुंडा सूतगिरणी मंजूर करण्यात यश मिळविले आहे. त्यांच्याकडे भाजप आदिवासी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष पद आहे. राळेगाव, कळंब व बाभूळगाव या तीन तालुक्‍यातील नगरपंचायती भारतीय जनता पार्टीकडे राखण्यात यश मिळविले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com