आजचा वाढदिवस : अब्दुल सत्तार, राज्यमंत्री, शिवसेना

 आजचा वाढदिवस : अब्दुल सत्तार, राज्यमंत्री, शिवसेना

औरंगाबाद : सिल्लोड शहरातील अत्यंत गरीब कुटुंबातून पुढे आलेल्या अब्दुल सत्तार यांनी मोलमजुरी, हमाली करून आपले शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान छोटासा सायकल दुकान व्यवसाय सुरु केला. 1984 साली सिल्लोड ग्रामपंचायतची निवडणूक लढवून जिंकली. माजी मंत्री कै.बाबूरावजी काळे, सहकार महर्षी कै. बाळासाहेब पवार, शिक्षण व सहकार महर्षी कै.माणिकरावजी पालोदकर यांच्यासोबत राजकारणामध्ये काम करण्याची व राजकारण शिकण्याची त्यांना संधी मिळाली. 
1994 साली सिल्लोड नगरपरिषदेची पहिली निवडणूक झाली. सिल्लोड नगरपरिषदेचे ते पहिले नगराध्यक्ष झाले. नगरपरिषदेच्या वीस वर्षाच्या सत्ता कार्यकाळात अडीच-तीन वर्षे सोडता पूर्ण कार्यकाळ अब्दुल सत्तार दाम्पत्यांनी नगराध्यक्ष पद भूषविले आहे व आजही सत्ता त्यांच्याचकडेच आहे. विविध शिक्षण संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅंक, हज कमेटी, रोजगार हमी योजना, पंचायत राज आदि शासकीय समित्यांसह विविध समित्यांवर त्यांनी काम केले आहे. 

कै.शंकररावजी चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांना कॉंग्रेस पक्षात नुसता प्रवेश दिला नाही तर 2001 साली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधानपरिषदेची उमेदवारी मिळवून दिली. विरोधकांवर मात करत ते विधानपरिषद सदस्य झाले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचे सुरेश बनकर यांचा पराभव करून ते 13 हजार 991 मतांनी निवडून आले. 2019 मध्ये शिवसेनेत प्रवेश करत त्यांनी धनुष्यबाणाचा प्रचार करून आमदारकी मिळवली आणि राज्यमंत्रीपदही मिळवले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com