आजचा वाढदिवस : संदीपान भुमरे, आमदार पैठण - शिवसेना. - birthdat bhumre | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : संदीपान भुमरे, आमदार पैठण - शिवसेना.

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 जुलै 2018

आमदार संदीपान आसाराम भुमरे यांनी सर्वप्रथम पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि ते राजकारणात आले. उपसभापतिपदी वर्णी लागल्यानंतर या दरम्यान वाढलेल्या जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी 1995 मध्ये पैठण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडे उमेदवारी मागितली. पक्षाने त्यांच्यावर विश्‍वास दाखवला आणि पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवत भुमरे यांनी तो सार्थ ठरवला. दरम्यान, संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक असलेल्या संदीपान भुमरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर 1999 व 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भुमरे यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ घातली.

आमदार संदीपान आसाराम भुमरे यांनी सर्वप्रथम पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि ते राजकारणात आले. उपसभापतिपदी वर्णी लागल्यानंतर या दरम्यान वाढलेल्या जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी 1995 मध्ये पैठण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडे उमेदवारी मागितली. पक्षाने त्यांच्यावर विश्‍वास दाखवला आणि पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवत भुमरे यांनी तो सार्थ ठरवला. दरम्यान, संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक असलेल्या संदीपान भुमरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर 1999 व 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भुमरे यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ घातली. भुमरे या दोन्ही निवडणुकीत विजयी झाले आणि त्यांनी आमदारकीची हॅटट्रिक केली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा संदीपान भुमरे यांच्यावर विश्‍वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आणि ते चौथ्यांदा विधानसभेवर निवडून गेले. संदीपान भुमरे यांनी विहामांडवा येथील शरद कारखान्याच्या निवडणुकीत गेल्या वर्षी दणदणीत विजय मिळवत तो ताब्यात घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने 2017-18 चा पहिला गाळप हंगाम यशस्वी केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख