साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीतच : या समितीने केला ठराव

saibaba pathri samadhi
saibaba pathri samadhi

परभणी : साईबाबांचे जन्मस्थळ हे पाथरीच आहे. शिर्डीकरांनी हे उदार अंतकरणाने मान्य करावे, त्यात दुख वाटून घेण्यासारखे काही नाही. राज्य शासनाने या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करून निर्णय घ्यावा असा ठराव मंगळवारी साई जन्मभूमी पाथरी (जि. परभणी) येथे झालेल्या भव्य ग्रामसभेत घेण्यात आला.

पाथरी (जि.परभणी) येथे मंगळवारी श्री साईबाबांची महाआरती करण्यात आली. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साई संस्थानचा तीर्थक्षेत्र विकासातंर्गत विकास केला जाईल असे घोषित केले होते. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी 12 वाजता पाथरी येथील साई मंदिरात महाआरती करण्यात आली.

यावेळी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीसह हजारो भाविक उपस्थित होते. या महाआरतीनंतर खासदा संजय जाधव, पाथरी विकास कृती समितीचे अध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, परभणीचे आमदार डॉ. राहूल पाटील, पाथरीचे आमदार सुरेश वरपुडकर, माजी आमदार विजय भांबळे, माजी आमदार मोहन फड या नेत्यासह जिल्हाभरातील राजकीय पदाधिकारी व भाविकांमध्ये बैठक झाली. या बैठकीत शासनाने आमचे म्हणणे ऐकून न घेता निर्णय घेवू नये. जन्मस्थळावर आम्ही ठाम आहोत असे यावेळी या बैठकीत एकमताने ठरले.

बुधवारी मुख्यमंत्र्याची घेणार भेट

जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पक्षीय नेते व साई जन्मभूमी संस्थानचे विश्वस्त हे बुधवारी मुंबई येथे जाणार असून ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. या भेटी दरम्यान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तोडगा काढावा असा आग्रह धरला जाणार आहे. त्यासाठी एक समिती स्थापन करावी अशी मागणी केली जाणार आहे.

पश्चिम महाराष्टाराचा सातत्याने विरोध
मराठवाड्याच्या विकासात आडथळा आणण्याचे काम सातत्याने पश्चिम महाराष्ट्राकडून केले जाते. पंरतू आम्ही साईबाबांच्या शिर्डी येथील संस्थानबद्दल कधी काही बोललो नाही. आम्हाला शिर्डीबदद्लही तेवढेच प्रेम आहे. पंरतू शिर्डीकरांनी हा अट्टहास सोडावा आणि उदार अंतरकरणाने जन्मभुमी पाथरीचे अस्तित्व मान्य करावे असे खासदार संजय जाधव यांनी सांगितले.

राज्य शासनाने दोन्ही बाजू ऐकून निर्णय घ्यावा
राज्य शासनाने साई जन्मभूमी म्हणून आम्ही आराखडा दाखल केला आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. एखाद्या मुद्यावरून वाद असेल तर दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला देखील चर्चेला आमंत्रित करावे असे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितेल.

जन्मस्थळावर आम्ही ठामच
पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थळ आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत. मराठवाड्यातील सर्वच आमदार, खासदार एकत्र येऊन मुख्यमंत्र्याकडे बाजू मांडणार आहोत असे आमदार सुरेश वरपुडकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com