'संजीवनी'च्या बिपिन कोल्हेंनी तयार केले सर्वात स्वस्त 'सॅनीटायझर'

कोपरगावच्या संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकन पूर्ण करणारे इथेनॉल बेस्ड 'संजीवनी हॅंड सॅनीटायझर' तयार केले आहे. हे सॅनीटायझर बाजारात उपलब्ध सॅनीयाटझरच्या तुलनेत अधिक उपयुक्त व निम्म्या किमतीत मिळणार आहे
Bipinl Kolhe of Sanjeevani Produced Cheap Sanitizer
Bipinl Kolhe of Sanjeevani Produced Cheap Sanitizer

नाशिक : कोपरगावच्या संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकन पूर्ण करणारे इथेनॉल बेस्ड 'संजीवनी हॅंड सॅनीटायझर' तयार केले आहे. हे सॅनीटायझर बाजारात उपलब्ध सॅनीयाटझरच्या तुलनेत अधिक उपयुक्त व निम्म्या किमतीत मिळणार आहे. यापुढे त्याचे नियमीत उत्पादन सुरु करण्यात आले आहे. 

संकट आले की सामन्य माणसे चिंतेत अडकतात. परिस्थिती सामान्य होण्याची वाट पाहतात. कल्पक व्यक्ती या संकटातून नवा मार्ग शोधतात आणि इतरांना दाखवतात. असेच काहीसे कोपरगावच्या संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी केले आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्याने सगळीकडे वारंवार हात धुने, सॅनीटायझरचा वापर करणे या सुचना दिल्या जातात. मात्र, बाजारात सॅनीटायझरचा तुटवडा आहे. जे आहेत ती अत्यंत महागड्या दरात विक्री केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर अनेक कंपन्यांनी सॅनीटायझरचे परवाने मिळवले आहेत. त्यांची उत्पादनेही व्यवसायिकच आहेत. 

मात्र, या सर्व गोंधळात श्री कोल्हे यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यू.एच.ओ.) निकषांनुसार इथेनॉल बेस्ड 'संजीवनी' सॅनीटायझर तयार केले आहे. शनिवारी त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 90 मी.ली. 45 रुपयांस तर 180 मी.ली. 90 रुपये त्याची किंमत आहे. याशिवाय अर्धा, एक व पाच लिटर या क्वांटीटीमध्येही ते उपलब्ध आहे. सहकारी क्षेत्रातील संस्थेने अनेक उत्पादने केली आहेत. त्यात साखर कारखान्याशी संबंधीत संस्थेकडून केलेले उत्पादन म्हणून सॅनीटायझरची निर्मीतीचा प्रयोग मात्र काळाबरोबर धावणारा पहिला प्रयोग ठरला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com