Bihar to give financial Help to Each Family Announces Nitish Kumar | Sarkarnama

नितीश कुमारांची घोषणा; 'कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर एक हजार रुपयांचे अर्थसहाय्य

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रत्येक कुटुंबाला एक हजार रुपायांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे

पाटना : 'कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रत्येक कुटुंबाला एक हजार रुपायांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे.

यापूर्वी बिहार सरकारने नगरपंचायत व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रहिवासीयांसाठी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना एक हजार रुपये अनुदान जाहीर केले होते. याद्वारे घरातच अडकून पडल्याने मजुरी व काम गनावलेल्या गरीब कुटुंबांना अन्नधान्य आणि अन्य उदरनिर्वाहासाठी हे साह्य देण्यात येणार होते.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या आदेशात सुधारणा केली आहे. आता राज्यातील सर्व भागांत त्याची अंमलबजावणी होईल. विशेषतः शहरी भागासह सबंध राज्यात कुठेही वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना 'कोरोना' मुळे निर्माण झालेल्या या स्थितीत प्रती कुटुंब एक हजारांचे सहाय्य दिले जाणार आहे. अशा प्रकारे 'कोरोना' विरोधात उपाययोजना करतांना कुटुंबांना थेट अर्थसहाय्याची घोषणा करणारे बिहार हे पहिले राज्य ठरले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख