महसुली उत्पन्न घटल्याने मुंबईतले मोठे प्रकल्प रखडणार?

महापालिकेच्या महसुली उत्पन्नात घट होत असून गेल्या वर्षीही अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. यंदा उत्पन्न घटल्याचा परिणाम मोठ्या प्रकल्पांवर होण्याची शक्‍यता आहे
Big Projects of Mumabi Municipal Corporation may be Delayed
Big Projects of Mumabi Municipal Corporation may be Delayed

मुंबई : महापालिकेच्या महसुली उत्पन्नात घट होत असून गेल्या वर्षीही अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. यंदा उत्पन्न घटल्याचा परिणाम मोठ्या प्रकल्पांवर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी उभारायचा कसा, असा प्रश्‍न विविध खात्यांच्या विभागप्रमुखांना पडला आहे.

वस्तू सेवा कर लागू झाल्याने पालिकेला दरवर्षी मिळणाऱ्या 9 हजार कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले. त्यामुळे सध्या पालिकेकडे मालमत्ता कर आणि विकास नियोजन खाते हे दोन मुख्य उत्पन्नाचे स्रोत आहेत. मालमत्ता करापोटी पालिकेला पाच हजार कोटी रुपये, तर विकास नियोजन खात्याचा चार हजार कोटी रुपये इतका महसूल पालिकेला दरवर्षी मिळतो. 

या दोन्ही उत्पन्नात सध्या घट होत आहे. ही घट तब्बल एक हजार कोटींहून अधिक आहे. विविध कर आणि अनुदानापोटी राज्य सरकारकडे पालिकेची 4500 कोटी रुपये थकबाकी आहे. पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेली जकात रद्द झाल्यानंतर सध्या मालमत्ता आणि विकास नियोजन या खात्यांचा महसूलही घटू लागला आहे. त्यामुळे पालिकेचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधी कसा उभारावा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी 'कोस्टल रोड प्रकल्प' पालिका राबवित आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता निधीची गरज आहे. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करायचा आहे. त्यामुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण करणे हे पालिकेसाठी आव्हान आहे. कोस्टल रोड, मलनिःसारण, पाणीपुरवठा प्रकल्प असे मोठे प्रकल्प पूर्ण करायचे, ते प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्पात त्यासाठी पुरेशी तरतूद करावी लागणार आहे. ही तरतूद करताना अर्थसंकल्प समतोल ठेवण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com