BIG DECISION कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रत्येक आमदाराला 50 लाख रूपये ! 

या निर्णयामुळे जिल्ह्यातील सर्व आमदारांचा फंड एकत्रित करून मोठ्या प्रमाणावर जिल्हा पातळीवर यंत्रणा उभी करता येईल.
BIG DECISION कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रत्येक आमदाराला 50 लाख रूपये ! 

मुंबई : कोरोना व्हायरस या साथीच्या रोगाचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी आमदार फंडाचा वापर करण्यास शासनाची मंजुरी दिली असून प्रत्येक आमदाराला 50 लाखांपर्यंत वैद्यकीय साधनसामुग्री आणि साहित्य खरेदी करता येणार आहे. 

मात्र या साधनसामुग्रीच्या दुरुस्तीसाठी हा फंडाचा वापर करता येणार नाही 

या निर्णयामुळे जिल्ह्यातील सर्व आमदारांचा फंड एकत्रित करून मोठ्या प्रमाणावर जिल्हा पातळीवर यंत्रणा उभी करता येईल. 

स्थायी व इतर समित्यांच्या निवडणुकांना स्थगिती 
दरम्यान, जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचे भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि मुंबईत आढळून येत आहे. देशभरातही रुग्णांची संख्या मोठी आहे. नागरिकांनी गर्दी करू नये, व व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. 

त्यामुळे एप्रिलच्या सुरुवातीला होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, नगर पंचायतमधील स्थायी, विषय समित्या व सदस्य निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्याच्या नगर विकास विभागाने तसे पत्र सर्व विभागीय आयुक्त, महानगर पालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. 

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचे महाराष्ट्रात 159 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 86 रुग्ण मुंबई आणि परिसरातील आहेत. देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com