उदयनराजेंचा सामना थेट `बिग बाॅस`शी

उदयनराजेंचा सामना थेट `बिग बाॅस`शी

पुणे : महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांच्या प्रदेशात आज या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांची अवस्था, उद्योजकांची अवस्था किती चांगली आहे, असा सवाल करत सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी अभिजित वामनराव आवाडे बिचुकले यांनी  अखिल बहुजन समाज सेना स्थापन केल्याची घोषणा केली.

``मी माझ्या पक्षातर्फे आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये २८८  जागा लढवणार आहे. त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम समाजसेवी कार्यकर्त्यांना, लोकनेत्यांना व होतकरूंना आणि सर्व पक्षांमध्ये कित्येक वर्षे एकनिष्ठ काम करून त्याठिकाणी आपला शिक्का जमून सुद्धा पक्षश्रेष्ठींनी डावललेल्या सर्व लोकांना पक्षांमध्ये सामील होण्याचे आवाहन त्यांनी केले.

`बिग बॉस` या रिअॅलिटी शो मधून घराघरांमध्ये मी पोचलो आहे. मी किती खरा माणूस आहे, हे महाराष्ट्रातील  जनतेने पाहिले आहे. लहानपणापासून मुख्यमंत्री होण्याचे एक स्वप्न मी उराशी बाळगलेले आहे, असेही त्यांनी सांगितले.


बिचकुले म्हणाले,
- उदयनराजे यांच्या विरोधात मी मागील 20 वर्षापासून निवडणूक लढवत आलो आहे.
- मला संसद सदस्य म्हणून दिल्लीत जायचे आहे
- मला मुख्यमंत्री व्हायचे आहे.
- अखिल बहुजन समाज सेना पक्षाच्या माध्यमातून राज्यातील सर्वच्या सर्व 288 जागा लढविणार आहोत.
- या पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष माझी पत्नी आहे.
- बिग बॉस मुळे मला प्रसिद्धी मिळाली. मला सर्वाधिक टीआरपी आहे.
- राज्याला चांगला मुख्यमंत्री पाहिजे.
- या वेळी जरी मुख्यमंत्री झालो नाही, तरी 2024 साली मी मुख्यमंत्री होणारच
- शेतकरी आणि ग्रामीण भागात मोठ्या समस्या आहेत.
- मी लोकसभा पोटनिवडणूक लढविणार
- शरद पवार जरी सातारातून लोकसभा पोटनिवडणूक लढले तरी मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणार
- माझ्या पक्षात घराणेशाही चालणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com