माझा जन्म देशभक्त कुटुंबात, 370 कलम रद्द केले ते योग्यच, हुड्डांचा कॉंग्रेसला घरचा आहेर 

माझा जन्म देशभक्त कुटुंबात, 370 कलम रद्द केले ते योग्यच, हुड्डांचा कॉंग्रेसला घरचा आहेर 

रोहटक (हरियाना) : मोदी सरकारने काश्‍मिरातील वादग्रस्त 370 कलम रद्द केल्यानंतर कॉंग्रेसमध्येही या मुद्यावरून दोन गट पडलेले दिसतात. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर हरियानाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा यांनीही काश्‍मिर मुद्यावरून कॉंग्रेसला घरचा आहेर दिला असून मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. 

Paste this code directly into the HTML portion of your site, and you'll be good to go. Need more info?

रोहटकमध्ये बोलताना हुड्डा म्हणाले, की माझा देशभक्त कुटुंबात जन्म झाला आहे. जे 370 कलम रद्द करण्याला विरोध करतात त्यांना माझाही विरोधच असेल. मोदी सरकारच्या या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना इशारा देताना आपल्या खास शैलीत ते म्हणाले,"" वसुंलोपर जहॉं आँच आहे, वहॉं टकराना जरूरी है ! जो जिंदा है तो जिंदा दिखाना जरूरी है !'' 

कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी पुन्हा अध्यक्ष बनले नाही. आता सोनिया गांधी यांना हंगामी अध्यक्ष करण्यात आले आहे. कॉंग्रेसला भाजपने पार खिळखिळे करून सोडले आहे. जम्मू-काश्‍मिरातील 370 कलम रद्द केल्यानंतर तर कॉंग्रेसमध्ये या मुद्यावरून दोन गट पडले आहेत. स्वत: राहुल गांधी यांनी मोदी-शहा यांच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. काही नेते समर्थन करीत आहेत. आता हुड्डा यांनीही मोदी-शहांच्या निर्णयाचे स्वागत करीत कॉंग्रेसवरच टीका केली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com