bhupesh baghel and chattisgad state | Sarkarnama

छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी भूपेश बाघेल

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 डिसेंबर 2018

रायपूर : राजस्थान आणि मध्यप्रदेशनंतर कॉंग्रेसने छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी भूपेश बाघेल यांची निवड केली आहे. निकाल लागल्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर कॉंग्रेसने बाघेल यांचे नाव जाहीर केले आहे. या पासाठी निवड करताना कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना बरीच कसरत करावी लागली आहे. 

मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत आघाडीवर असणारे भूपेश बाघेल यांच्या हातीच सूत्रे सोपवल्याने या राज्यातील कॉंग्रेसमध्ये उत्साह पसरला आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थाननंतर छत्तीसगडमध्येही मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्‍चित करताना कॉंग्रेस अध्यक्ष या दोन्ही राज्यांपेक्षा छत्तीसगडमधील नाव निश्‍चित करणे कठीण होते. कारण इथे दोन नव्हे तर चार-चार दावेदार होते. अखेर भूपेश बाघेल यांनी बाजी मारली. 

बाघेल यांच्याशिवाय टी एस सिंहदेव, ताम्रध्वज साहू आणि चरणदास अनंत यांच्या नावाचीही चर्चा होती. भूपेश बाघेल कॉंग्रेसच्या छत्तीसगड प्रदेशा शाखेचे अध्यक्षही आहेत. शेतकरी कुटुंबातून आलेले भूपेश बघेल हे राजकारणातील आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. 90 जागा असलेल्या छत्तीसगड विधानसभेत कॉंग्रेसने 68 जागांवर विजय मिळवला आहे. भूपेश बाघेल कॉंग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. रमणसिंह सरकारसह कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या अजित जोगी यांचाही त्यांनी सामना केला. कुर्मी क्षत्रिय परिवाराशी बाघेल हे संबंधित आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख