हरिभाऊ बागडेंच्या अनुभवाचा मला फायदाच होईल - संदीपान भुमरे

 हरिभाऊ बागडेंच्या अनुभवाचा मला फायदाच होईल - संदीपान भुमरे

औरंगाबाद : शिवसेनेने भाजपची साथ सोडून कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत राज्यात सत्ता स्थापन केली. तेव्हापासून गेली अनेक वर्ष एकमेकांचे मित्र असलेल्या शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये दुरावा आला आहे. रोज एकमेकांच्या विरोधात विधाने करत कुरघोडीचे प्रयत्न होतांना दिसतात. रोहयोमंत्री संदीपान भुमरे मात्र याला अपवाद ठरले आहेत. रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन खात्याचे मंत्री राहिलेले भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे हे माझ्यासाठी मार्गदर्शक ठरतील आणि त्यांच्या दांडग्या अनुभवाचा मला भविष्यात फायदाच होईल अशा शब्दांत संदीपान भुमरे यांनी बागडेंचे कौतुक केले. 

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत आज माजी अध्यक्ष दिवगंत सुरेश पाटील यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. या बॅंकेचे संचालक म्हणून संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, हरिभाऊ बागडे या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी संदीपान भुमरे यांनी आपल्या भाषणात सुरेश पाटील यांच्या उत्तम प्रशासन आणि करड्या शिस्तीचा उल्लेख करतांना त्यांची तुलना हरिभाऊ बागडे यांच्याशी केली. 

भुमरे म्हणाले, लोकाभिमुख व शिस्तप्रिय प्रशासनाचा पुरस्कार करणारे सुरेश पाटील (दादा) आमचे खरे मार्गदर्शक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरेच काही शिकता आले आणि आता त्यांची मार्गदर्शकाची भूमिका बागडे नाना निभावत आहेत. नानांना सहकार आणि सरकार या दोन्ही गोष्टींचा दांडगा अनुभव आहे, रोजगार हमी खातेही नानांनी 1999 च्या युती सरकारमध्ये असतांना सांभाळले आहे. त्यामुळे यांच्या या अनुभवाच्या शिदोरीचा नक्कीच मला फायदा होणार आहे. रोजगार हमी व फलोत्पादन खात्यामार्फत मी शेतकरी व सर्वसामान्य माणसांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाही देखील संदीपान भुमरे यांनी यावेळी दिली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com