bhumare and cbinet expansion | Sarkarnama

भूमरेंची वाटचाल साखर कारखान्यावर स्लीप बॉय ते कॅबिनेट मंत्री ...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 डिसेंबर 2019

राजकारणातील पहिलीच निवडणूक बिनविरोध जिंकून भुमरे यांनी आपल्या राजकीय भविष्यातील वाटचालीची झलक दाखवली होती. ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केल्यानंतर 92 ते 94 दरम्यान पाचोड पंचायत समिती उपसभापती पद त्यांनी भूषवले. राजकारणात दमदार वाटचाल करत संदीपान भुमरे यांनी सहकार क्षेत्रात देखील उडी घेतली. 1993 मध्ये ज्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात स्लीप बॉय म्हणून काम केले त्याच कारखान्यात संचालक आणि 96 मध्ये चेअरमन झाले. 

औरंगाबाद : पैठण विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा निवडून येण्याचा विक्रम करणारे शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांची ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. पाचोड सारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. एसएससीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर भुमरे यांनी 1982 मध्ये पैठणच्या संत एकनाथ साखर कारखान्यात स्लीप बॉय म्हणून नोकरी केली. 1989 मध्ये ते राजकारणात सक्रीय झाले. पाचोड शिवसेना शाखाप्रमुख म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यानंतर भुमरे यांची पाचोड ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली. 

राजकारणातील पहिलीच निवडणूक बिनविरोध जिंकून भुमरे यांनी आपल्या राजकीय भविष्यातील वाटचालीची झलक दाखवली होती. ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केल्यानंतर 92 ते 94 दरम्यान पाचोड पंचायत समिती उपसभापती पद त्यांनी भूषवले. राजकारणात दमदार वाटचाल करत संदीपान भुमरे यांनी सहकार क्षेत्रात देखील उडी घेतली. 1993 मध्ये ज्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात स्लीप बॉय म्हणून काम केले त्याच कारखान्यात संचालक आणि 96 मध्ये चेअरमन झाले. 
विधानसभेत पाहिले पाऊल 
1995 मध्ये शिवसेनेने सर्वप्रथम भुमरे यांना पैठणमधून विधानसभेची उमेदवारी दिली. पहिलीच निवडणूक जिंकून भुमरे यांनी विधानसभेत पाहिले पाऊल ठेवले. त्यानंतर 2009 वगळता भुमरे यांनी पाचवेळा आमदार होण्याचा मान पटकावला. याशिवाय संत एकनाथ महाराज विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष, विहामंडवा येथील शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक म्हणून देखील भुमरे कार्यरत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख