Bhujbal Mahajan Supporters both Taking credit of Yeola Water | Sarkarnama

येवल्यात पाण्यासाठी भुजबळ आणि गिरीश महाजन समर्थकांत रंगली श्रेयवादाची लढाई 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

पावसाळ्यात पावसाअभावी अवर्षणप्रवण येवल्यात परिस्थिती बिकट बनली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पालखेड डाव्या कालव्याला आवर्तन सोडण्यात आले आहे. गावोगावी आरक्षित बंधाऱ्यांना पाणी मिळण्याची मागणी होत आहे. याआधी पाणी देण्यासाठी जिल्हाधिकारी नकार देत होते. मात्र आता पाणी देण्याचा निर्णय झाला आहे. यावरून आमदार छगन भुजबळ व पालकमंत्री गिरीश महाजन समर्थकांत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.

येवला : सध्या पावसाळा आहे. मात्र, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात पाण्याचे टिप्पुसही नाही. त्यामुळे तालुक्‍यासाठी पालखेड कालव्याचे पाणी सोडण्यात येणार आहे. त्याने गावोगावचे बंधारे भरुन मिळावेत असे प्रयत्न आहेत. महत्‌प्रयासाने पाणी मिळाले. त्यामुळे ते कोणामुळे मिळाले यावरुन छगन भुजबळ समर्थक आणि पालकमंत्री गिरीश महाजन समर्थकांत श्रेयवादाची लढाई रंगली आहे. 

पावसाळ्यात पावसाअभावी अवर्षणप्रवण येवल्यात परिस्थिती बिकट बनली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पालखेड डाव्या कालव्याला आवर्तन सोडण्यात आले आहे. गावोगावी आरक्षित बंधाऱ्यांना पाणी मिळण्याची मागणी होत आहे. याआधी पाणी देण्यासाठी जिल्हाधिकारी नकार देत होते. मात्र आता पाणी देण्याचा निर्णय झाला आहे. यावरून आमदार छगन भुजबळ व पालकमंत्री गिरीश महाजन समर्थकांत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. त्यासाठी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आदेश दिल्याचा भाजपा नेते बाबा डमाळे यांचा दावा आहे. त्यासाठी महाजन यांची त्यांनी मुंबईत भेट घेतली. त्यानंतर महाजन यांनी पाणी सोडण्याचे आदेश दिले. या भेटीचे फोटो देखील त्यांनी व्हायरल केले आहेत. 

त्याला प्रत्युत्तर म्हणुन माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांनी पाणी भुजबळांच्या पाठपुराव्याने मिळाले, असा दावा केला आहे. मागील आठवड्यात भुजबळ यांनी परिस्थितीची पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांना येवला व मनमाड शहराला तात्काळ पाणी देण्याबाबत सूचित केले होते. त्यामुळे पाणी मिळाले असा त्यांचा दावा आहे. दोन्ही नेत्यांचे समर्थक याविषयी सोशल मिडीयावर आक्रमकपणे बाजू मांडत असल्याने श्रेयवादाची लढाई रंगली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख