मोदी साहेब एवढे शूर आहेत तर कुलभूषण जाधवला का सोडवले नाही ? : छगन भुजबळ

 मोदी साहेब एवढे शूर आहेत तर कुलभूषण जाधवला का सोडवले नाही ? : छगन भुजबळ

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरून पाकिस्तानने पायलट अभिनंदनला सोडले असे म्हणता, मग दोन वर्षे झालीत कुलभूषण जाधवला का सोडवू शकला नाही असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा नाशिक लोकसभा मतदारसंघाचा कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी भुजबळ म्हणाले, आपल्या भारताला क्रमांक एकचे सैन्यदल लाभले आहे. त्याचे काम अनेक वर्षे सुरू आहे. लालबहाद्दूर शास्त्री आणि यशवंतराव चव्हाण यांनी सैन्याला प्रोत्साहन दिले. युध्दात पाकिस्तानचा पराभव केला. एपीजे अब्दुल कलाम यांनी मोठे योगदान सैन्याला दिले. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. हजार पाकिस्तानी सैनिक परत केले. कोणीही सोन्याचे राजकीयीकरण केले नाही. मात्र मोदी यांनी ते केले. 

विरोधक सैनिकी कारवाईचे राजकारण करतात असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. या आरोपाचा उल्लेख करून ते म्हणाले, पुलवामा दहशतवादी हल्ला दुपारी 3.57 वाजता झाला. तेव्हा कॉंग्रेसच्या प्रियंका गांधी यांनी आपली पत्रकार परिषद रद्द करून सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. राहुल गांधी यांनी आपले कार्यक्रम बंद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र सायंकाळी सहाला सभा घेत होते. 6.30 वाजता केरळमध्ये योगी सभा घेत होते. रात्री आठला अमित शहा केरळमध्ये सभा घेत होते. मग कारवाईचे राजकारण कोण करत आहे हे स्पष्ट आहे. 

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी राज्यमंत्री प्रशांत हिरे, आमदार हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, श्रीराम शेटे, जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, निवृत्ती अरिंगळे, अर्जुन टिळे, श्रीराम शेटे, रवींद्र पगार,संदिप गुळवे, माजी आमदार जयंत जाधव, शहराध्यक्ष रंजना ठाकरे, भारती पवार, अमृता पवार आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com